फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसोहळ्यातील फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे. त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत. दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फरहान-शिबानीच्या लग्नात अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फरहान मुस्लिम आणि शिबानी हिंदू आहेत. यामुळेच त्यांना धार्मिक भेदभाव होऊ नये असे वाटते. सध्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.