छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती, 50 तरुणांना सोबत घेऊन समीर शेख शिवनेरीवर पोहोचला. बीड मध्ये राहणारा समीर शेख 9 वर्षांपासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत गावी घेऊन जात आहे. शिवज्योत पेटवून 200 किलोमीटरचा प्रवास करून 'सांगवी पाटण' गावी पोहचत आहे. समीरच्या घरावर भगवी पताका डोलताना पाहायला मिळतेय दिवाळी आणि ईदला सगळीकडे जसा आनंद पाहायला मिळतो तसाच आनंद शिवजयंतीला आमच्या घरात असतो Iगावात मोठ्या उत्साहात गावात शिवजयंती साजरी केली जाते.