‘नॅशनल क्रश’ ठरलेली अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या प्रचंड चर्चेत आहे.
नुकतीच अभिनेत्री ‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत झळकली आहे.
या चित्रपटातील रश्मिकाच्या कामाचे प्रेक्षकांनी देखील तोंडभरून कौतुक केले आहे.
‘पुष्पा’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रश्मिकाचे मानधन वधारले आहे.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदनाच्या नावाचा समावेश झाला आहे.
मात्र, रश्मिकाने अनेक सुपर हिट चित्रपट नाकारल्यामुळे, ते नव्या संधींना मुकली देखील आहे.
‘पुष्पा’ या चित्रपटासाठी रश्मिका तब्बल 3 कोटी रुपये मानधन म्हणून आकारले आहेत
मात्र, आता रश्मिका चर्चेत आलीये ते शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटामुळे
याआधीही या अभिनेत्रीने दिग्दर्शक शंकरचा चित्रपट 'RC15' हा चित्रपट नाकारला आहे.
इतकेच नाही तर, रश्मिकाने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा एक आगामी चित्रपट देखील नाकारला आहे.