सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर यात्रेतील प्रमुख दिवस आज आहे. राज्यभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कावडी येत असतात. रस्त्याच्या काही मार्गाने येणार्या कावडी डोंगरावर दाखल होऊ लागल्या आहेत. मुख्य थरार मुंगी घाटातील खपारीतून वरती येणाऱ्या कावडींचा असेल. कोरोनामुळे दोन वर्ष भरू न शकलेल्या यात्रेला यंदा परवानगी मिळाली आहे. यामुळं भाविकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिखर शिंगणापूरमध्ये यात्रेसाठी हजारो भाविक येत असतात. जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक यंदा देखील दाखल झाले आहेत.