मराठमोळे अभिनेते अजय पुरकर गेले अनेक दिवस पावनखिंड सिनेमामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

आता अजय पुरकर यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेतून निरोप घेतला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अजय पुरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

अजय पुरकर यांनी अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

लवकरच अजय पुरकर 'शेर शिवराज' सिनेमात दिसणार आहेत.

'पावनखिंड' सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती.

अजय पुरकर यांचे 'कोडमंत्र' नाटक प्रचंड गाजले होते.

बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या प्रोजेक्टचा अजय पुरकर भाग आहेत.