अभिनेत्री सारा अली खानने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबत साराने भावूक कॅप्शनही शेअर केलं आहे.
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या 'केदारनाथ' या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. केदारनाथ चित्रपट बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.
'केदारनाथ' या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सारा अली खानने चित्रपटाच्या सेटवरील काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सुशांतसोबत पोज देताना दिसत आहे.
फोटो शेअर करताना साराने लिहिलं आहे की, चार वर्षांपूर्वी माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं. हे अजूनही अजूनही स्वप्न असल्यासारखं वाटतं आणि कदाचित मला नेहमीच असं वाटत राहिल.
साराने पुढे लिहिलं की, मी ऑगस्ट 2017 मध्ये परत जाण्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि या चित्रपटाचा प्रत्येक सीन पुन्हा शूट करण्याची माझी इच्छा आहे. या दरम्यानचा प्रत्येक क्षण पुन्हा जगण्याची माझी इच्छा आहे.
'मी सुशांतकडून संगीत, चित्रपट, पुस्तकं, आयुष्य, अभिनय, तारे आणि आकाश याविषयी खूप काही शिकायला मिळालं. आयुष्यभराच्या आठवणींसाठी धन्यवाद...', असं म्हणत साराने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सारा अली खानने 2018 साली केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
केदारनाथ चित्रपटासाठी साराला फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळाला होता. साराने चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन वर्ष उलटली आहे. या दरम्यानच्या काळात साराने वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतसाठीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी मृत्यू झाला होता. सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लावले गेले.