नेहा भसिन तिच्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. नेहाच्या फॅब्युलस लूकवर चाहते फिदा आहेत. नुकतंच तिने तिचे काही फोटो अपलोड केले आहेत. काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये तिने मादक अदा दिल्या आहेत. स्मोकी आय, ग्लॉसी लिप्स आणि साईड स्वेप्ट हेअर स्टाईल असा लूक आहे. या ड्रेसवर सुटेबल हिल्सही तिने घातले आहेत. नेहा भसिन वयाच्या 40 व्या वर्षीही ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. तिच्या प्रत्येक फोटोतून तिचा आत्मविश्वास दिसतोय. नेहाचे हे फोटो प्रत्येकाला आकर्षित करुन घेतात. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.