कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.



ऋषभ शेट्टी यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.



नुकताच ऋषभ शेट्टीनं एक व्हिडीओ शेअर करुन या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली.



मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.



आता या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



ऋषभ शेट्टी आणि नेटफ्लिक्सच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.



व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक ऋषभला मेसेज करुन कांताराच्या हिंदी व्हर्जनबाबत विचारत आहेत.या प्रश्नांना ऋषभ उत्तर देतो.



कांतारा 9 डिसेंबरला हिंदीत नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.



अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे.



‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.