सारा अली खान सध्या काश्मीरमध्ये सुट्टी घालवत आहे. सारा अनेकदा तिच्या कुटुंब आणि मित्रांसोबत सहलीला जाते. अलीकडेच तिने काश्मीरमधील पहलगाममध्ये कॅम्पिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. साराने एक व्हिडीओ शेअर आहे. या व्हिडीओमध्ये ती एका कॅम्पसाईटवर स्वतःचे जेवण बनवताना दिसत आहे. साराने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. साराने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा एका छोट्या खुर्चीवर बसून स्टोव्हवर ठेवलेल्या पॅनमध्ये पालक आणि टोमॅटो तळत असल्याचे दिसून येते. यावेळी तिने उबदार कपडे घातले आहेत. साराच्या मागे भरपूर मसाले आणि स्वयंपाकाचे साहित्य ठेवले आहे. साराने शेअर केलेल्या या फोटोत ती नदीच्या काठावर उभी असल्याचे दिसत आहे.