नवरंग पक्षी कोकणात दाखल झाला की पावसाच्या आगमनाची वेळ जवळ आल्याचं निश्चित मानलं जातं.



फार कमी पक्षी हे आपला विणीचा हंगाम वादळी वातावरणात निवडतात आणि त्यातीलच नवरंग हा एक पक्षी आहे.



वादळ सदृष्य परिस्थितीत हा पक्षी आपले घरटे बांधण्यात व्यस्त असतो.



हा पक्षी नऊ रंगांचा बनलेला असल्यामुळे याला नवरंग असे संबोधण्यात येते.



भगवा, पिवळा, हिरवा, निळा, काळा, पांढरा, पोपटी, किरमिजी हे नऊ रंग पाहायला मिळतात.



या पक्षाला Indian Pitta (इंडियन पिट्टा) असे देखील संबोधले जाते.



पिता हा तेलगू शब्दापासून घेतलेला शब्द आहे. पित्ता या शब्दाचा अर्थ लहान असा होतो.



पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात.



हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असू भुंड्या शेपटीचा आहे.



त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो.



नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.