भारतात कोरोनाचा संसर्गात किंचिंत घट झाल्याचं आढळून आलं आहे देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 487 नवे कोरोनाबाधित आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे शनिवारी दिवसभरात 2 हजार 878 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 17 हजार 692 वर पोहोचला आहे सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.74 टक्के झाले आहेत आधीच्या दिवशी 2 हजार 858 नवीन रुग्णांची नोंद आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या 248 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने केली आहे मुंबईत कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आणि एक रुग्णाचा बळी गेला आहे देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी 673 नवीन कोविड प्रकरणे आणि आणखी चार मृत्यूंची नोंद झाली आहे