मागील आठवड्यात 12 जुलै रोजी सप्तशृंग गडावरील गणपती टप्प्याजवळ बस कोसळली होती. या अपघातात बसमधील एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चालक वाहक यांच्यासह 22 जण जखमी झाले होते. सप्तशृंगगड ते नांदुरी आणि नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता आज (19 जुलै) बंद ठेवला होता नाशिकच्या सप्तशृंगगड येथे 12 जुलैला झालेल्या अपघातातील अपघात ग्रस्त बस दरीच्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर आज सकाळी दहा वाजता सुरु केले होते 3 क्रेनसह आपत्ती व्यवस्थापन, कळवण बस आगार, पोलीस प्रशासन, वन विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ यांच्या मदतीने बस दरीतून काढण्याची कार्यवाही पूर्ण केली दरीत कोसळलेली बस काढण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता सकाळी दहा ते कार्यवाही सुरु करण्यात आली होती