सपना चौधरीने हरियाणासह संपूर्ण भारतात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सपना चौधरी तिच्या साधेपणासाठी आणि डान्ससाठी ओळखली जाते. सपना चौधरी इंडस्ट्रीतील एक अशी कलाकार आहे जी इतर इंडस्ट्रीतील लोकांना देखील खूप आवडते. सपना तिच्या गाण्यासाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती तिच्या चाहत्यांच्या कनेक्शनसाठी देखील ओळखली जाते. सपना अल्बम गाण्यांसोबत लाइव्ह कॉन्सर्टही करते. तिच्या स्टेज डान्सला खूप पसंती दिली जाते. अलिकडेच सपना चौधरीचा एक स्टेज डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत चना चन जीते मरेगी या गाण्यावर सपना नाचत आहे. चाहत्यांनी सपनाचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे. स्टेजवर सपनाचा देसी अंदाज पाहायला मिळाला. व्हिडिओमध्ये हरियाणा क्विव लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.