संस्कृती बालगुडेच्या हॉट अदा; चाहते झाले फिदा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सतत ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत असते. संस्कृतीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. 'पिंजरा' या मालिकेतून संस्कृतीने छोट्या पडद्यावर एण्ट्री केली होती. सोशल मीडियावर संस्कृतीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.