साडीला मॉडर्न टच; मयूरीचं भन्नाट फोटोशूट 'खुलता कळी ही खुलेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या हिंदी मालिकांमध्ये झळकतीये 'इमली' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी मयुरी मराठीसोबतच प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहेच त्याचसोबत हिंदी भाषिक प्रेक्षकही मयूरीला भरभरून प्रेम देतायत. 'खुलता कळी ही खुलेना' मालिकेतून मयुरी घरोघरी पोहचली. मयुरीची सोशल मीडिया भरपूर हवा आहे, ती नेहमीच तिचे नवे फोटो शेअर करत असते नुकतेच मयुरीने तिचं नवं फोटोशूट शेअर केलंय ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसतीये.