बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 'केडी' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं. संजय दत्तला गंभीर दुखापत झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत होते. संजयने आता ट्वीट करत दुखापतीच्या वृत्तावर खुलासा केला आहे. संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले आहे. संजयने ट्वीट केलं आहे,मला गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण या बातम्या निराधार आहेत. मी ठीक आहे आणि निरोगीदेखील आहे. संजय दत्तने पुढे लिहिलं आहे,माझ्यासाठी तुम्ही चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार. संजय दत्त सध्या बंगळुरूमध्ये 'केडी-द-डेविल' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. बॉलीवूडमध्ये 'मुन्नाभाई' अशी ओळख असलेला सुपरस्टार संजय दत्त शूटिंगदरम्यान जखमी झाल्यामुळे चर्चेत आहे. संजय दत्तने नुकतच 'लियो' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. संजय दत्तचा 'हेरा फेरी 3' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.