बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आदित्य नारायणने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. आदित्यने तीन महिन्यांसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्याने सोशल मीडियावरील सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. आदित्यने एक खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी आदित्यने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. आदित्य नारायणने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यासोबत सर्व पोस्टदेखील हटवल्या आहेत. आदित्य नारायणने 2009 साली 'शपित' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.