समंथानं तिचे न्यूयॉर्कमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये समंथा ही हेवी वर्क केलेल्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
समंथानं तिचे न्यूयॉर्कमधील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'न्यूयॉर्कमध्ये स्वप्ने बनतात, असं अनेकजण म्हणतात. मी माझ्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग इथे केले आहे.'
पुढे समंथानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी एक घाबरलेली छोटी मुलगी होते जिच्याकडे मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस होते!'
न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमामध्ये समंथानं ब्लॅक साडी, गोल्डन बँगल्स आणि इअरिंग्स असा लूक केला होता.
समंथानं तिच्या या आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले.
समंथाच्या या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
समंथाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
समंथा ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.