सुभेदार चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सुभेदार या चित्रपटामधील अजय पुरकर यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अजय हे या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. आता सुभेदार या चित्रपटामधील इतर कलाकारांच्या लूकनं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सुभेदार या चित्रपटामध्ये येसाजी कंक यांची भूमिका भूषण शिवतरे यांनी साकारली आहे.
सुभेदार चित्रपटामधील मोरोपंत ही भूमिका श्रीकांत प्रभाकरनं साकारली आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशांपडेनं सुभेदार या चित्रपटामध्ये केशर ही भूमिका साकारली आहे. मृण्मयीचा या चित्रपटामधील अभिनया पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटामध्ये जीवा ही भूमिका साकारणार आहे.
अभिनेता अस्ताद काळे हा सुभेदार या चित्रपटात विश्वास या भूमिकेत दिसणार आहे.
बाजी सर्जेराव जेधे यांची भूमिका अभिनेता बिपिन सुर्वे साकारणार आहे.
सुभेदार या चित्रपटामध्ये वीर बाजी पासलकर ही भूमिका अभिनेते सुनील जाधव यांनी साकारली आहे.
अभिनेता पूर्णानंज वाढेकर हा सुभेदार या चित्रपटामध्ये नवलजी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.