अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



नुकतीच मानसीनं गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मानसीनं विविध विषयांवर चर्चा केली.



रिल्सबाबत मानसीनं सांगितलं, 'मला एक खूप मोठा दिग्दर्शक म्हणाला होता की, तू अजून रिल्स का करतेस? लोकांना प्रश्न पडतो की, एवढी मोठी कलाकार असूनही का रिल्स करते? मी त्या दिग्दर्शकाला सांगितलं होतं की, मी मोठी कलाकार नाही, मला मोठं व्हायचंय. मला चित्रपट मिळत नाहीये म्हणून मी रिल्स करतीये.'



पुढे तिनं सांगितलं, 'चित्रपट न मिळण्याची खंत ही कोणत्याही कलाकाराला असते, मलाही आहे. मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. मला कष्ट करायला आवडतात.'



भार्गवीनं मुलाखतीमध्ये मानसीला तिच्या पहिल्या चित्रपटामधील किसिंग सिनबाबत विचारलं होतं. तेव्हा मानसी म्हणाली, 'मी त्या चित्रपटात एक नाही तर दोन किसिंग सिन केले होते.'



मानसी ही जबरदस्त,फक्त लढ म्हणा या चित्रपटांमध्ये मानसीनं काम केलं.



चार दिवस सासूचे या मालिकेत देखील मानसीनं काम केलं.



'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या गाण्यांमुळे मानसीला विशेष लोकप्रियता मिळाली.



मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असते.



मानसीला इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.