अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहरुखनं अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जाणून घेऊयात शाहरुखच्या बिग बजेट चित्रपटांबद्दल... शाहरुखच्या जवान या आगामी चित्रपटाची निर्मिती 300 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला पठाण या चित्रपटाची निर्मिती 250 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. 2014 मध्ये शाहरुखचा हॅपी न्यू ईअर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती 150 कोटींमध्ये करण्यात आली. 2011 मध्ये रिलीज झालेला रा वन हा चित्रपट 130 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. दिलवाले या चित्रपटाची निर्मिती 135 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. शाहरुखच्या झिरो या चित्रपटाची निर्मिती 200 कोटींमध्ये करण्यात आली होती. शाहरुखचा फॅन हा चित्रपट 120 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला.