अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. विभक्त झाल्यानंतर समंथा आणि नागा चैतन्य यांनी पर्सनल लाइफबद्दल बोलणे टाळले. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये समंथाने तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. '2022 मध्ये कोणत्या गोष्टी घडव्यात असं तुला वाटतं?'असा प्रश्न नुकत्याच एका मुलाखतीमध्ये समंथाला विचारण्यात आला. समंथाने उत्तर दिले, '2021 या वर्षात माझ्या पर्सनल लाइफमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या.' 'आता मी कोणतीही आपेक्षा करत नाही. भविष्यात माझ्यासोबत जे काही घडेल त्यासाठी मी तयार आहे.' 'मला इतकच माहित आहे की, मी माझ्याकडून शक्य आहेत तितके प्रयत्न करत राहणार आहे. ' ‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.