सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नाला समंथा नेहमी उत्तर देते. समंथानं नुकतच सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग हे सेशन केले. सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी समंथाला वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नाला समंथानं हटक्या पद्धतीनं उत्तर दिलं आहे. एका नेटकऱ्यानं समंथाला अजब प्रश्न विचारला. त्यानं विचारलं की, 'Have you reproduced because I wanna reproduce you' नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत समंथा म्हणाली, 'आधी reproduce हा शब्द वाक्यामध्ये कसा लिहायचा हे गूगलवर सर्च कर आणि मग प्रश्न विचार ' दुसऱ्या नेटकऱ्यानं विचारलं की, 'तुला चित्रपटाचे दिग्दर्शन करायला आवडेल का?' प्रश्नाला समंथानं उत्तर दिलं की, 'मी ही गोष्ट कधी शिकले नाही आणि मी आत्ताच याबद्दल काही सांगू शकत नाही.' समंथाच्या एका चाहत्यानं तिला प्रश्न विचारला, 'तु बरी आहेस का?' यावर समंथा म्हणाली, 'हो, मला हा प्रश्न विचारल्याबद्दल तुमचे आभार' समंथाने नुकताच तिच्या 'शकुंतलम' या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरला समंथाच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.