अभिनेता रणवीर सिंहनं नुकतेच त्याच्या डॅशिंग लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रणवीर या फोटोमध्ये ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. ब्लॅक गॉगल, ब्लॅक शर्ट, ब्लॅख कोट अशा लूकमधील फोटो रणवीरनं शेअर केले आहेत. रणवीरच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे. रणवीरनं हा लूक रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला होता. रणवीरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीरनं रॉकी रंधावा ही भूमिका साकारली आहे. रणवीरचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. रणवीर त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवतो.