बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ने U/A प्रमाणपत्र दिले आहे. पण या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, CBFC ने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यात काही बदल करण्यास सांगितले होते. चित्रपटात केलेल्या बदलांची ही यादी पुढील प्रमाणे आहे-
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील एका सीनमध्ये वापरण्यात आलेला 'ब्रा' हा शब्द बदलून त्या जागी 'आयटम' हा शब्द वापरण्यात आला आहे.
चित्रपटात लोकसभेचा संदर्भ आणि एक संवाद आहे, ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करण्यात आला होता. हा सीन बोर्डाने चित्रपटामधून पूर्णपणे काढायला सांगितला आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधील व्हॉट झुमका आणि तुम क्या मिले ही गाणी रिलीज झाली. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
आलिया आणि रणवीरचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.