स्टार्ट इंडिया फाउंडेशन आणि एशियन पेंट्सच्या वतीनं
मुंबई अर्बन आर्टस फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.
दक्षिण मुंबईतील ससून डॉकमधल्या एका जुन्या इमारतीमध्ये
या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे
ससून डॉकसारख्या परिसरात मुंबईकर एरवी फारसं जात नाहीत
पण त्याच ठिकाणी आर्टस फेस्टिव्हलचं आयोजन करून त्या परिसराचा कायापालट
करण्यासाठी स्टार्ट इंडिया फाऊंडेशनच्या वतीनं या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे
पुढील तीन महिने हे फेस्टिव्हल विनामूल्य पाहता येणार आहे.
कोरोनानंतर च्या काळात मुंबईमध्ये खूप कमी फेस्टिव्हल पाहायला मिळाली आहेत
या फेस्टिव्हल मध्ये wall painting, mural, installations पाहायला मिळतील !
फेस्टिव्हल ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे
(फोटो : विनीत वैद्य)