सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान आज 21 वा वाढदिवस साजरा करत आहे.



इब्राहिमचे फोटो अनेकदा व्हायरल होतात, जे सैफच्या सुरुवातीच्या कारकिर्दीची आठवण करून देतात.



सैफने एका मुलाखतीत सांगितले होते की, अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याला मुलांना भेटू दिले जात नव्हते



त्याचा मुलगा इब्राहिमचा फोटो त्याच्या पाकिटात नेहमी असायचा. प्रत्येक वेळी सैफ मुलाचा फोटो बघून रडायचा.



साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, इब्राहिम सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे, त्यामुळे सध्या अभिनय करणे खूप दूरची गोष्ट आहे



त्याला आवड आहे आणि अभिनयाची भावनाही आतून जागृत झाली आहे. त्याला अभिनय करायचा असेल तर तो आधी लॉस एंजिलिसला जाऊन त्याचा अभ्यास करेल