प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचं आगमन झालं



भारतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. तिनं, इट् अ बॉय अशी पोस्ट शेअर तेली होती.



सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान भारतीला प्रॉमिस करताना दिसत आहे.



बिग बॉस -15 मध्ये हर्ष आणि भारती हे हुनरबाज या त्यांच्या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते



तेव्हा भारतीनं सलमानला तिच्या होणाऱ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची विनंती केली होती.



भारती म्हणाली होती की, 'करण जोहरनं तिच्या मुलाला लाँच करायला नकार दिला. तर तु माझ्या मुलाला लाँच करशील का?'



भारतीच्या या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'नक्कीच मी तुझ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल.



आता सलमाननं भारतीला दिलेलं प्रोमिस तो पूर्ण करेल का? याची वाट प्रेक्षक पाहात आहेत.