शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त



मुंबईतील कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.



आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश



संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची ईडीकडून माहिती



संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई



संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती.



याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे



याच पार्श्वभूमीवर ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.



संजय राऊत म्हणाले की, ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती.
ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही.


महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असेही राऊत म्हणाले..
फोटो सौजन्य - facebook.com/sanjayraut.official