दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. आज याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.



लवकरच या संदर्भातली घोषणा होईल, महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा महिला कुस्तीगीरांसाठीही संधी उपलब्ध होईल असे त्या म्हणाल्या आहेत.



हरियाणामध्ये कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात, महाराष्ट्रामध्येही क्षमता आहे, आपणही ते करायला पाहिजे.असंही सय्यद म्हणाल्या आहेत.



1969 पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्यात येते. मात्र यात केवळ पुरूषांचा सहभाग असतो, आता महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे.



ही घोषणा महिला मल्लांसाठी क्रांतिकारी ठरण्याची शक्यता आहे.



महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. या खेळात आधी पुरुषांचाच सहभाग होता. मात्र आता महाराष्ट्रातही अनेक मुली सध्या कुस्तीकडे वळत आहेत, असे दीपाली सय्यद म्हणाल्या.