ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपला आव्हान दिलं

ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती.

ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता.

त्यांना जर मदत केली नाही तर माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील अशी माहिती होती.

कष्ठाने कमावलेली संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

ही संपत्ती मी कष्टाच्या पैशातून घेतली आहे.

एक रुपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर

मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत.

सूडाच्या कारवायांना मी घाबरत नाही. हा सूड मराठी माणसावर घेतला जात आहे,

इतकं खालचं राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं.

माझ्यावर 55 लाखांचं कर्ज होतं याची माहिती मी शपथपत्रात दिली होती.

ईडीच्या कारवायांना सामोरं जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत.

या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते आता होत आहेत.

माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन.

इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना,

या खोटेपणाला घाबरत नाही.

काय करणार तुम्ही? माझ्या डोक्याला बंदूक लावाल ना? मी वॉकला जातो, तेव्हा हरेन पंड्याप्रमाणे मला माराल,

गोळी माराल.. माझं चॅलेंज आहे, गोळी तुमच्यावर उलटेल.