मुकेश म्हणाला की, सलमान हा 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. त्याचं लाईफस्टाईल अत्यंत साधं आहे.
लोकांना सलमानबद्दल गैरसमज होतो, असं मुकेश छाब्रानं एका मुलाखतीत सांगितलं.
सलमान खान हा असा व्यक्ती आहे, जो नेहमीच प्रत्येकासाठी उपलब्ध असतो, जो तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी उभा असतो.' असंही मुकेशनं सांगितलं.
मुकेश छाब्रा म्हणाला, सलमान साधे जीवन जगतो. त्याचा 1 बीएचके फ्लॅट आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यात एक सोफा, एक जेवणाचे टेबल, लोकांशी चर्चा करण्यासाठी एक लहान जागा, एक लहान जिम आणि एक खोली आहे.'
देशातील सर्वात मोठा स्टार सलमान खान हा अत्यंत साधं जीवन जगतो. त्याला फॅन्सी ब्रँड आवडत नाहीत किंवा तो महागड्या वस्तू विकत घेत नाहीत. मी 15 वर्षांपासून त्याला ओळखतो, मी त्याला बदललेलं पाहिलं नाही.असंही मुकेशनं सांगितलं.
'सलमानचा मूड सतत बदलतो. त्यामुळे आज त्याचा मूड कसा आहे? हे तुम्हाला चेक करावं लागतं.' असंही मुकेशनं सलमानबाबत बोलताना सांगितलं.
'किसी का भाई किसी की जान' हा सलमानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे.