सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा टायगर-3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान आणि कतरिना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सलमान आणि कतरिना यांचे चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. कतरिना आणि सलमान यांचा टायगर जिंदा है हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. सलमान आणि कतरिनाचा पार्टनर हा चित्रपट तुम्ही जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. सलमान आणि कतरिना यांचा युवराज हा चित्रपट तुम्ही झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहू शकता. मैने प्यार क्यूं किया हा सलमान आणि कतरिना यांचा कॉमेडी चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. सलमान खान आणि कतरिना कैफचा भारत हा चित्रपट देखील तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. आता सलमान खान आणि कतरिनाच्या टायगर-3 चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सलमानचा टायगर 3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.