अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत, गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि पनवेलच्या फार्माहाऊसच्या शेजा-यांमध्ये भांडण सुरु आहे.



सलमानने त्याचे शेजारी केतन कक्करविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.



मुंबईच्या एका न्यायालयाने याप्रकरणी सलमानची याचिका फेटाळून लावली आहे. केतन कक्कर यांनी सलमानवर केलेले आरोप खरे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.



दुसरीकडे, आपली बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा सलमानने केला होता. केतन यांनी दिलेल्या कागदोपत्री पुराव्याच्या आधारे न्यायालयाने हा आदेश दिला आहे.



या कागदत्रांमध्ये सलमानने केतन कक्कर यांना त्यांच्या जमीनीवर येण्यापासून रोखल्याचे अधोरेखित होते.



मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एच. लद्दाद म्हणाले, माझ्या मते खान हे या प्रकरणाशी कसे संबंधित आहे हे स्पष्ट करण्यात अयशस्वी ठरले