नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे. लाखो लोक नोराला फॉलो करतात. नोराचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. प्रत्येक वेळी ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने जिंकणारी नोरा नेहमी हटके लूकमध्ये दिसते. नोरा तिच्या नृत्य शैलीसाठी संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. नोराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ‘सत्यमेव जयते’, ‘रॉकी हँडसम’, ‘बाटला हाऊस’ इत्यादी सिनेमांमध्ये तिने तिच्या नृत्यानं चार चांद लावले आहेत.