नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर विविध वस्तूंचे विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.



नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी निर्माण केलेल्या वस्तू रेल्वे स्थानकावर विक्री करण्याचा हे देशातील पहिलाच उपक्रम आहे.



या खास विक्री केंद्रातून कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू रेल्वे प्रवाशांना खरेदी करता येणार आहेत.



त्यामध्ये विणकाम, हातमाग, सुतार काम आणि लोहार कामातून तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचा समावेश आहे.



शिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कैद्यांनी दिवाळीला लागणारे अनेक सजावटीचे वस्तू ही तयार केल्या आहेत



त्यामध्ये विविध आकर्षक आकाश दिवे, पणत्या, सजावटीचे मातीचे आणि लाकडी साहित्य यासह खादीचे टॉवेल, चादर, बेडशीट यांचा समावेश आहे.



कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमध्ये ही अनेक कलागुण असतात.



त्याच कलागुणांना वाव देऊन भविष्यात कैद्यांच्या योग्य पुनर्वसनाच्या योजनेअंतर्गत कैद्यांना विविध वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.



आता रेल्वे स्टेशनवर विशेष विक्री केंद्राच्या माध्यमातून कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.