जर चंद्रापर्यंत रस्ता असेल तर गाडीने किती वेळात पोहोचू शकाल?

Published by: एबीपी माझा वेब टीम

नासाच्या माहितीनुसार, पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यानचे अंतर सुमारे 3,84,400 किलोमीटर आहे.

आजपर्यंत चंद्रावर सर्वात वेगाने पोहोचलेले यान अपोलो ८ आहे.

अपोलो ८ च्या प्रक्षेपणानंतर हे अंतराळयान ६९ तास आणि ८ मिनिटात चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ अंतराळयानात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर अवलंबून असतो.

जर कारने चंद्रावर जाणे शक्य झाले, तर सरासरी 3,84,400 किलोमीटरचे अंतर पार करावे लागेल.

जर 96 kmph च्या सरासरी वेगाने प्रवास केला, तर कारने चंद्रावर जायला 166 दिवस लागू शकतात.

आजच्या काळात, कारने चंद्रावर जाणे केवळ कल्पना आहे. पण तंत्रज्ञानाचा विचार करता, याची कल्पना करता येते.

तुमच्या माहितीसाठी, कारला चंद्रावर जाण्यासाठी अवकाशातून प्रवास करावा लागेल.

हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखाद्या स्पेसक्राफ्टला कारचा आकार दिला जाईल.