टाटा सिएरा खरेदी करण्यासाठी दर महिन्याला किती ईएमआय भरावे लागतील?

Published by: एबीपी माझा वेब टीम

भारतीय बाजारात टाटा सिएराला खूप पसंती मिळत आहे.

तुम्हाला माहीत आहे का की टाटा सिएरा दर महिन्याला किती EMI वर मिळेल?

गाडी 11.49 लाख एक्स शोरूम किमतीत बाजारात आणली आहे

टाटा सिएराच्या किंमतीत टॅक्स जोडल्यानंतर, तिची ऑन-रोड किंमत वाढते.

टाटा सिॲरा ह्या गाडीच्या सुरुवातीच्या मॉडेलची दिल्लीमधील ऑन-रोड किंमत 13.30 लाख रुपये आहे.

टाटा सिएराचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट द्यावे लागेल.

9 टक्के व्याज दराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, मासिक हप्ता अंदाजे 23, 751 रुपये येईल.

टाटा सिएरा 50 लीटर क्षमतेच्या टाकीसह येते आणि चांगले मायलेज देते.

इंदौर येथे असलेल्या NATRAX ट्रॅकवर सिएराने 29.9 kmpl चा विक्रमित मायलेज मिळवला आहे.