‘सैराट’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलंय. रिंकू सोशल मीडियावरही सक्रिय असून, तिच्या कामासोबत तिच्या आयुष्यातील काही क्षणचित्रेही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा पारंपरिक पेहरावात दिसणाऱ्या रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाजही चाहत्यांना खूप भावतो. रिंकूने नुकतेच साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर 4 लाख 94 हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (All Photo : iamrinkurajguru/IG)