बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या बहुप्रतिक्षित 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. 'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. ट्रेलरमध्ये परश्या आणि आर्चीचा अनोखा अंदाज दिसत आहे. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर तिच्या झुंड या सिनेमातील खास लूकचे काही फोटो शेअर केलेत. ज्यात रिंकूचा वेगळाच अंदाज दिसून येत आहे. यात रिंकू ड्रेस मध्ये दिसत आहे, कपाळावर गोंदण आणि वेणी असा साधारण लूक केलेला दिसत आहे. 'नमस्ते मेरा नाम है मोनिका' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे. या फोटोंवर तिच्या एका फॅनने 'अरे देवा 😮 काय हा आवतार 😱' अशी कमेंट केली आहे.