अंडी वापरणे केसांसाठी खूप चांगले आहे अंड्याच्या वापराने केस गळण्याचे प्रमाण कमी होते अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यामुळे केसांना ताकद मिळते अंड्यांमध्ये असलेले फॉलिक अॅसिड केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते, इतकंच नाही तर केस गळण्यापासूनही बचाव होतो तुम्ही अंड्याचा हेअर मास्क लावला तर तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून नक्कीच सुटका मिळेल अंड्यांमध्ये प्रथिने आढळतात ज्यामुळे पेशींची दुरुस्ती होते आणि त्यांची लवकर वाढ होण्यास मदत होते अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन अंडी, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब लॅव्हेंडर तेल मिसळा हे मिश्रण केसांना वीस मिनिटे लावा आणि केस थंड पाण्यानेच धुवा गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. कारण असे केल्यास, अंड्याचा वास केसात तसाच राहील त्यानंतर केसांना शँपू लावा आणि कंडिशनर लाऊन स्वच्छ करा. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा लावू शकता. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.