बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चाहता वर्ग मोठा आहे.



गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे.



एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले पण एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा खूप वाईट होता.



मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, 'ती जेव्हा 18 वर्षाची होती तेव्हा तिला एका व्यक्तीनं ब्रेस्ट सर्जरी म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट करून घेण्याचा सल्ला दिला.'



2007 मध्ये प्रदर्शित झालेला ओम शांती ओम हा दीपिकाचा पहिला चित्रपट होता.



दीपिकासोबतच अभिनेता शाहरूख खाननं देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.



मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, शाहरूखनं तिला चांगला सल्ला दिला.



दीपिकानं सांगितलं की, शाहरूखनं मला सांगितलं होतं की नेहमी अशा लोकांसोबत काम कर ज्यांच्यासोबत काम करताना तुला आनंद होतो.



' मी स्वत:ला नशिबवान समजते कारण मी ब्रेस्ट इम्प्लांट केलं नाही', असं दीपिका म्हणाली.