साई पल्लवी (Sai Pallavi) ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्याबाबत चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये साई पल्लवीनं काश्मिरी पंडितांबद्दल आणि मॉब लिंचिंगबाबत वक्तव्य केलं होतं. आता एका व्हिडीओच्या माध्यमातून साईनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. साईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये साई म्हणाली, 'असं पहिल्यांदा होत आहे की, मी कोणत्यातरी गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्या समोर आले आहे' माझे विचार मांडताना किंवा कोणत्याही विषयावर बोलताना मी दोनदा विचार करत आहे' असही साई म्हणाली. पुढे साई म्हणाली, 'माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची मला भीती वाटते. मी तुमच्या पर्यंत माझं मतं सांगायला उशिर केला असेल तर, मला माफ करा.' लवकरच साईचा 'विराट पर्वम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. साईचा चाहता वर्ग मोठा आहे. साईच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.