भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना बंगळुरू येथे खेळला जाणार आहे.



या मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधलीय.



आजच्या समान्यात विजय मिळवून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल.



भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्याकडं विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी उपलब्ध झालीय.



टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यापासून भुवनेश्वर कुमार एक विकेट्स दूर आहे.



पाचव्या टी-20 सामन्यात भुवनेश्वरनं एक विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल.



सध्या भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि किवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीसह संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.



दुसऱ्या टी-20 मध्ये भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी केली होती. त्यानं 13 धावा देऊन चार विकेट्स पटकावल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 सामन्यात त्याला एक-एक विकेट मिळाली.