पाच टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतानं पुढील दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धुळ चाखली.



या मालिकेतील तिसरा आणि चौथा टी-20 सामना जिंकून भारतानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.



आज या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.



आजच्या सामन्या विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे.



या मालिकेतील अखेरचा टी-20 सामना जिंकून भारताकडं इतिहास रचण्याची संधी आहे.



भारतानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकलेली नाही.



भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय.



भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.