साई पल्लवी तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. साईच्या सिंपल लूकचे अनेकजण वेडे आहेत. साईने तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलंय. साईने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा प्रेमम हा पहिलाच चित्रपट आणि त्यात साकारलेली 'मलर'... हा चित्रपट अद्यापही अनेकांच्या काळजात घर करुन आहे. साईने मारी सारखा सुपरहिट चित्रपटही दिला आहे. खुल्या केसांमधील तिचे फोटो व्हायरल होतात. साडीमध्ये साईचे सौंदर्य अधिकच खुलतंय. साई तिच्या 'विराट पर्वम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.