भारतासाठी अनेक विक्रम करणारी भारताची शटलर पीव्ही सिंधूचा आज 27 वा वाढदिवस



वयाच्या 27 व्या वर्षी तिनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीय.



पीव्ही सिंधुनं तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्यापासून तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा फडकावला.



भारतीय शटलर पीव्ही सिंधु ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे.



तिनं 2016 मध्ये रियो ऑम्पिकमध्ये हे रौप्यपदक जिंकलंय. त्यानंतर तिनं ऑलिंम्पिक 2022 मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून देशाचं नाव मोठं केलं. 



बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पीव्ही सिंधु पहिली भारतीय एकेरी खेळाडू आहे.



बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा पराभव केला होता.



हे सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी तिनं 2017 आणि 2018 मध्ये या स्पर्धेत संयुक्त रौप्यपदक जिंकलं होतं.



पीव्ही सिंधूनं बीडब्लूएफच्या वर्ल्ड टूरच्या अंतिम सामना जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.



2018 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी तिनं अशी कामगिरी करून दाखवली होती. त्यावेळी तिनं नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-17 असा पराभव केला होता.