भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.



या पराभवामुळे मालिकेत 2-1 ने आघाडीवर असलेला भारत मालिका जिंकू शकला नाही.



मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली.



सामन्यात अखेरच्या डावात भारताने दिलेले 378 धावांचे लक्ष्य इंग्लंडने एका सेशनमध्ये 7 गडी राखून जिंकले.



यामध्ये जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांची शतकं फार महत्त्वाची ठरली.



पहिल्या डावात पंत आणि जाडेजा यांच्या द्वीशतकीय भागिदारीने भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.



त्यानंतर इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या 106 धावांच्या जोरावर धावसंख्या 284 पर्यंत नेली.



दुसऱ्या डावात भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले होते.



हे लक्ष्य सात गडी राखून रुट आणि बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पूर्ण केले.