काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सईचं सौंदर्य; पाहा खास फोटो मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर म्हणजे अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. बिगबॉस मराठीमुळे नावारूपाला आलेली ही अभिनेत्री सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूक मधले फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतेच तिने काही खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेत. ज्यात तिने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलाय. सई या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.