सातव्या वेतन आयोगाच्या गेल्या 18 महिन्यांपासून प्रलंबित DA थकबाकीवर या आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो



लवकरच सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीएचे पैसे खात्यात ट्रान्सफर करू शकते



देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना या आठवड्यात केंद्र सरकारकडून मोठी बातमी मिळू शकते



गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) च्या थकबाकीवर या आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो



मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो



यावेळी बैठकीत रखडलेल्या डीएबाबत निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्यासोबत त्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते



नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकार अडकलेल्या डीएच्या पैशांचा वन टाईम सेटलमेंट सेटलमेंट करू शकते



त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच केंद्र सरकारकडून खूशखबर येण्याची शक्यता आहे